सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव लोहारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव माकणे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, राजाराम माने, माजी प्राचार्य शिवाजीराव नवरखेले, नारायण बेजगमवार, गौरीशंकर शेटे, अभिमन्यू धोंडगे, अर्जुन मद्रेवार, डॉ. एन.जी. मिर्झा, अजय धनेश्वर, अजित घंटेवाड, शिवकुमार सोनटक्के, सागर होळदांडगे, शिवलिंग गादगे, प्रदीप तेलंग, ज्ञानोबा महालिंगे, रमेश पाटील चापोलीकर, सादिक नदाफ, शिवप्रसाद होळदांडगे, लक्ष्मण तिकटे, अनिल महालिंगे, अविनाश स्वामी, दत्तात्रय झांबरे, चाँदसाब हरणमारे, निळकंठ वाघमारे, किशोर मुंडे, मुकुंद बेजगमवार, प्रशांत सगरे, शुभम स्वामी, निखिल येरनाळे, प्रकाश बेजगमवार, गोकूळ जाधव आदी सहभागी झाले होते.
शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत कार्यालयात थांबणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश अधिकारी, कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज वेळेवर होत नाही. यासंदर्भात निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. १ जुलैपासून तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, प्राध्यापक, शिक्षकांनी मुख्यालयी रहावे. जे राहणार नाहीत. त्यांचे घरभाडे बंद करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विभागप्रमुखांची गुरुवारी बैठक...
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. येत्या गुरुवारी याविषयी प्रत्येक विभाग प्रमुखाची बैठक बोलाविली आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे. प्रत्येक कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन बसविण्यावर निर्णय घेण्यात येईल आणि त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.