लातुरात महाबँक कर्मचाऱ्यांचे नोकर भरतीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:07+5:302021-09-16T04:26:07+5:30

लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात युनाईटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्सच्यावतीने बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच कर्मचारी प्रलंबित ...

Dharna agitation for recruitment of Mahabank employees in Latur | लातुरात महाबँक कर्मचाऱ्यांचे नोकर भरतीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

लातुरात महाबँक कर्मचाऱ्यांचे नोकर भरतीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात युनाईटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्सच्यावतीने बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनादरम्यान मागणी दिवस, धरणे-निदर्शने असे कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने लातूरमध्ये महाबँक कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन व निदर्शने केली.

बुधवारी देशभरात बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयांसमोर हा धरणे कार्यक्रम झाला. या आंदोलनच्या अनुषंगाने लातूर येथील महाबँक कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. बँकेच्या अकराशेपेक्षा जास्त शाखांमध्ये कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत तर सहाशेपेक्षा जास्त शाखांमध्ये कायमस्वरूपी शिपाई नेमले गेलेले नाहीत. बँकेने गेल्या पाच वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या लिपिकाच्या जागा भरलेल्या नाहीत. या अंदाजे एक हजारपेक्षा जास्त जागा आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी बँकेतील नित्याचे कामदेखील आऊटसोर्स केले जात आहे. ज्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळे होण्याच्या शक्यता निर्माण होते. बँक अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या प्रथेला सोडचिठ्ठी देऊन, कर्मचाऱ्यांशी निगडीत निर्णय युनियन्सना विश्वासात न घेता एकतर्फी घेत आहे. त्याविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

या धरणे आंदोलनात लातूर क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते. संघटनेचे कॉ. होळीकर, कॉ. माने, कॉ. रत्नाकर कोटे, कॉ. संगमकर, कॉ. महेश घोडके, कॉ. रेश्मा भवरे, कॉ. मयूर प्रयाग, कॉ. विरेंद्र पाटील, कॉ. विपिन गिरी, कॉ. रोहित पेंडसे, कॉ. खारकर, कॉ. अश्विनी सावंत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Dharna agitation for recruitment of Mahabank employees in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.