तुळजाभवानी विद्यालयाच्या धनश्रीला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:45+5:302021-09-10T04:26:45+5:30

तुळजाभवानी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. या वेळी संस्था सचिव प्राचार्य डी. एन. ...

Dhanashree of Tuljabhavani Vidyalaya wins gold in state level wrestling competition | तुळजाभवानी विद्यालयाच्या धनश्रीला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

तुळजाभवानी विद्यालयाच्या धनश्रीला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

तुळजाभवानी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. या वेळी संस्था सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते धनश्रीला शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन कौतुक करण्यात आले. मैदानी खेळ जिंकण्यासाठी नियमित सरावाची गरज असते, असे नमूद करून प्राचार्य केंद्रे म्हणाले की, आजच्या तरुण व तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे. आपले ध्येय समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी या ऊर्जेचा वापर व्हावा. या वेळी मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे आदी उपस्थित होते. या यशाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख, आ. विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, पुणे कार्यालयातील उपसंचालिका डॉ. वंदना ओहळ, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, बोर्डाचे चेअरमन सुधाकर तेलंग, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, करिश्मा केंद्रे, आर. पी. मुंडे, विजयकुमार लोहारे, वर्षा स्वामी, शिवकुमार चिकले यांनी कौतुक केले.

Web Title: Dhanashree of Tuljabhavani Vidyalaya wins gold in state level wrestling competition