बुद्धांचा धम्म हे क्रांतीचे संविधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:44+5:302021-05-22T04:18:44+5:30
डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, ईहवाद, विज्ञान निष्ठा आणि मानवतावाद या तीन जीवन मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ ...

बुद्धांचा धम्म हे क्रांतीचे संविधान
डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, ईहवाद, विज्ञान निष्ठा आणि मानवतावाद या तीन जीवन मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञा भगवान बुद्धांच्या धम्माचा संक्षेप आहेत. मानवी जीवनासाठी २२ प्रतिज्ञा दीपस्तंभ आहेत. भगवान गौतम बुद्धांचा धम्म हे क्रांतीचे संविधान आहे. या प्रतिज्ञा बोलण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे. समाजातील काळीकुट्ट विचारधारा नाकारून प्रज्ञेच्या व निर्वाणाच्या प्रबुद्ध प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना धम्म दिला. प्रज्ञा हा विचार धम्म तर शील आणि करुणा हा आचार धम्म आहे, असेही डॉ. मनोहर म्हणाले.
मुख्य संयोजक भन्ते पय्यानंद यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. दुष्यंत कटारे यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. यावेळी बी.के. डोंगरगावकर, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. सिद्धोधन कांबळे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे आदींसह इतर जिल्ह्यातून अनेकांची उपस्थिती होती.