ग्रामपंचायत निवडणुकीत धडकनाळ ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:53+5:302021-01-02T04:16:53+5:30

बिनविरोध निवड झालेल्या सदस्यात बालाजी जीवनराव परकड, किसन सोपान सोनकांबळे, श्रीराम बालाजी सुरनर, सीना हरी गुबनर, द्रौपदी संजय होनमाने, ...

Dhadkanal Gram Panchayat unopposed in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत धडकनाळ ग्रामपंचायत बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीत धडकनाळ ग्रामपंचायत बिनविरोध

बिनविरोध निवड झालेल्या सदस्यात बालाजी जीवनराव परकड, किसन सोपान सोनकांबळे, श्रीराम बालाजी सुरनर, सीना हरी गुबनर, द्रौपदी संजय होनमाने, संगीता व्यंकटराव कमळे, माधवी विठ्ठलराव गुबनर यांचा समावेश आहे. हे सातही ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचे असल्याची माहिती चंदन पाटील नागराळकर यांनी दिली. त्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रा. बालाजी देवकत्ते, खुशालराव कोळगीर, कृष्णाजी पांचाळ, प्रकाश राजे, शिवाजी बिरादार, तुकाराम परकड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शफी हाशमी, महेश बिरादार, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dhadkanal Gram Panchayat unopposed in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.