शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
5
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
6
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
7
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
8
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
9
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
10
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
12
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
13
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
14
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
15
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
16
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
17
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
18
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
19
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
20
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Tirupati Train: भाविकांची मागणी पूर्ण! पंढरपूर-तिरुपतीदरम्यान लातूरमार्गे नव्या रेल्वे सेवेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:22 IST

Pandharpur to Tirupati Special Train: प्रवाशांनो, 'ट्रेन' पकडा! रेल्वेची पुढील रूपरेषा तुमच्या प्रतिसादावर अवलंबून

लातूर : पंढरपूर-तिरुपती व्हाया लातूर साप्ताहिक रेल्वेसेवा १३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी मंगळवारी दिली.

पंढरपूर (जि. साेलापूर) ते तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून प्रवाशांतून हाेत हाेती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समिती महत्त्वपूर्ण बैठकीत ही मागणी आग्रहाने लावून धरली. त्यांनी ही रेल्वेसेवा लातूरमार्गावरून पंढरपूर-तिरुपती सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची तिरुपती पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूर मार्गे सुरू करण्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या शनिवार, १३ डिसेंबरपासून ही गाडी सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०७०१२ ही १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी तिरुपती येथून सुटेल. ती गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदरमार्गे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लातूर स्थानकावर पोहोचेल. ही गाडी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्रमांक ०७०१३ दर रविवारी पंढरपूरहून रात्री आठ वाजता निघेल. ही गाडी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री साडेदहा वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचेल. या गाडीला एक एसी प्रथमवर्ग, एक एसी फर्स्ट कम-टू-टीअर , दोन एसी-टू-टीअर, ६ एसी थ्री टीअर, ९ स्लीपर क्लास, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असणार आहेत.

प्रवाशांच्या प्रतिसादावर ठरणार पुढील रूपरेषाही सुविधा तूर्तास १३ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू असणार आहे. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे संजय निलेगावकर यांनी सांगितले. शिवाय या बैठकीमध्ये हरंगुळ रेल्वे स्थानकाची प्लॅटफॉर्मची उंची, लांबी वाढविणे, लातूर-पुणे-खडकी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आदी विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती निलेगावकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pandharpur-Tirupati train service via Latur starts fulfilling devotees' long-standing demand.

Web Summary : Weekly Pandharpur-Tirupati train via Latur starts December 13. Train numbers 07012/07013 approved. Service runs until December 2025, contingent on passenger response. Railway committee also discussed Harangul station upgrades.
टॅग्स :railwayरेल्वेlaturलातूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटPandharpurपंढरपूर