नगरपंचायतीच्या विकासकामांची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:49+5:302021-03-19T04:18:49+5:30

रेणापूर नगरपंचायतअतंर्गत घरकुल योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. लाभार्थ्यांकडून शौचालयाच्या नावाखाली काही रक्कम कपात केली जात आहे. तसेच ...

The development work of Nagar Panchayat should be investigated | नगरपंचायतीच्या विकासकामांची चौकशी करावी

नगरपंचायतीच्या विकासकामांची चौकशी करावी

रेणापूर नगरपंचायतअतंर्गत घरकुल योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. लाभार्थ्यांकडून शौचालयाच्या नावाखाली काही रक्कम कपात केली जात आहे. तसेच शहरात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्चूनही अनेक ठिकाणी गटारी उघड्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची भीती नाकारता येत नाही. शहरातील सार्वजनिक सभागृहांचा वापर होत नाही. त्या केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. तसेच क्रीडा संकुलही कागदोपत्रीच आहे. शहरातील पाणीपुरवठा, बंद असलेल्या पथदिव्यांकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर राजाभाऊ राठोड, अमोल गोडभरले, विकास तपघाले, एकनाथ काळे, भगवान काळे, केदार साखरे, मुज्जम्मिल शेख, नेताजी तंगळे, गणेश राठोड, अक्षय चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The development work of Nagar Panchayat should be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.