मानवी जीवन घडविण्यासाठी ग्रंथप्रेम वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:32+5:302021-08-14T04:24:32+5:30
लातूर : मानवी जीवन सर्वांगसुंदर बनविण्याकरिता ग्रंथ वाचनाचे वेड लावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...

मानवी जीवन घडविण्यासाठी ग्रंथप्रेम वाढवावे
लातूर : मानवी जीवन सर्वांगसुंदर बनविण्याकरिता ग्रंथ वाचनाचे वेड लावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी येथे केले.
समाजकार्य विभागातील ग्रंथालयाच्यावतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. दिनेश मौने, प्रा. के. यू. पवार, डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. अशिष स्वामी, प्रा. नागेश जाधव, प्रा. प्रकाश राठोड, लेखापाल गणेश शेटे आदी उपस्थित होते. डॉ. डोंगरगे म्हणाले, समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी समाजात प्रत्यक्ष काम करताना सामाजिक सिद्धांत, समाजकार्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीचे ज्ञान मिळवावे. मानवी जीवनात ग्रंथ हेच गुरु आहेत. ग्रंथ वाचनाने व्यक्तीचे जीवनमान उंचावते. अनेक संकटे, आव्हानांना सामोरे जाताना ग्रंथ मित्राप्रमाणे आपल्याला मदत करतात. म्हणून ग्रंथ वाचन, संवर्धन, ग्रंथवृद्धी करून वाचनसंस्कृतीची रुजवणूक करायला हवी.
प्रास्ताविक डॉ. दिनेश मौने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागेश जाधव यांनी केले तर प्रा. के. यु. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विरसेन उटगे, रमेश राठोड, ज्योतिबा वलांडे, बालाजी डावकरे, संतोष येचेवाड, रोहित पवार, संजय गिरी, फुलचंद कावळे यांनी परिश्रम घेतले.