Devani shops are also closed on Sundays | देवणीतील दुकाने रविवारीही बंद

देवणीतील दुकाने रविवारीही बंद

वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती तसेच तालुका प्रशासनाने शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तालुका प्रशासनाने शहरासह प्रमुख गावांतील चौका-चौकांत बैठी पथके तैनात केले होते. याशिवाय भरारी पथकाची नियुक्ती करून तालुक्यात गस्त घालण्यात येत होती. तालुक्यातील नागरिकांनीही काळजी घेत घराबाहेर पडले नाहीत.

तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंगारे, रणजित काथवटे यांच्यासह महसूल, पोलीस, पंचायत समिती, कृषी, बांधकाम, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी या वीकेंड लॉकडाऊनमध्ये विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, तालुक्यातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप गुरमे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल एकगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंगराव कलंबर, डॉ. चेतन हत्ते, डॉ. कालीदास बिरादार, डॉ. फरान शेख, डॉ. होनखांबे, डॉ. बनसोडे, डॉ. घोरपडे, डॉ. साखरे यांच्यासह तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Devani shops are also closed on Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.