स्कोर २५, वय ७५ असतानाही कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:02+5:302021-04-30T04:25:02+5:30

अहमदपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चार खासगी हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात बाधितांवर उपचार केले जात आहेत. शहरातील विविध रुग्णालयात १३५ ...

Despite a score of 25 and 75, he defeated Corona | स्कोर २५, वय ७५ असतानाही कोरोनावर मात

स्कोर २५, वय ७५ असतानाही कोरोनावर मात

अहमदपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चार खासगी हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात बाधितांवर उपचार केले जात आहेत. शहरातील विविध रुग्णालयात १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन प्रशासनाच्या वतीने पुरविला जात आहे. त्यातच तालुक्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. त्यातील एक आजीबाई, जिचा स्कोर २४ होता. उपचारांनंतर त्या तंदुरुस्त झाल्या.

तसेच सय्यद रब्बानी यांचा स्कोर २५ आणि वय ७५ आहे. तेही उपचारांनंतर बरे झाले आहेत. यातील ९५ टक्के रुग्णांना रेमडेसिविरचा वापरही करण्यात आला नाही. उपचार, इच्छाशक्ती व योग्य समुपदेशनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरू नये. लक्षणे असलेल्यांनी चाचणी करून उपचार घ्यावेत.

गृहविलगीकरणात दुरुस्त...

ज्यांना कोविडची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांचे प्रमाण ७५ ते ८० टक्के आहे. त्यामुळे त्यांना योग्य समुपदेशन व औषधोपच देऊन गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यात ते दुरुस्त होत आहेत, असे डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.

रेमडेसिविरविना उपचार...

रेमडेसिविरमुळे फुफ्फुसांची सूज कमी होते. त्यावरील हे औषध आहे. मात्र, ९५ टक्के रुग्णांना हे इंजेक्शन लागत नाही. त्यासाठी अन्य औषधांचा वापर करता येतो, असे डॉ. पांडुरंग कदम यांनी सांगितले. शहरातील बाधितांपैकी ज्यांचा सिटीस्कॅन स्कोर १५ च्या पुढे आहे, असे अनेक रुग्ण दुरुस्त झाले आहेत, असे डॉ. अनुजा पाटील बेरळकर यांनी सांगितले.

चाचणीशिवाय उपचार करू नये...

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची कोविड तपासणी केल्यानंतर उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी खासगी डॉक्टरांच्या बैठकीत केल्या आहेत.

Web Title: Despite a score of 25 and 75, he defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.