वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:16+5:302021-03-06T04:19:16+5:30
लातूर : केंद्र शासनाने केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ...

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन
लातूर : केंद्र शासनाने केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित आघाडीकडून शेतकरी कायद्यांच्या विरोधात जिल्हा कचेरीसह तहसील कार्यालयांसमोरही धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी केले. केंद्र शासनाने केलेले कायदे भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यामुळे कायदे रद्द करण्यात यावेत, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, महिला आघाडीच्या सुजाता अजनीकर, जयश्री माने, शीतल भोसले, अंजना कांबळे, डॉ. तात्याराव वाघमारे, सचिन लामतुरे, गौतम उजेडकर, त्रिशरण मोहगावकर, यशवंत बोरीकर, सुरेश सूर्यवंशी, राहुल सोनवणे, नितीन गायकवाड, अजित गंगावणे, आकाश नवगिरे, रवी कांबळे, अभिजीत बनसोडे, विजय कांबळे, संजय क्षीरसागर, तात्याराव कांबळे, रावसाहेब कदम, रोहित सूर्यवंशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.