रेणापूर तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:20+5:302021-03-06T04:19:20+5:30
येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे ...

रेणापूर तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे
येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष कृष्णा वाघमारे, जिल्हा विधी सल्लागार ॲड.विठ्ठल खोडके, भरत मामडगे, मनोज चक्रे, स्वप्निल गोडखेले, शुभम आचार्य, ऋषिकेश आचार्य, प्रकाश भुतके, सुयोग आचार्य, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम ढगे, तात्याराव धावारे, अहमद शेख, विशाल बोडके, पीरपाशा शेख, सचिन सूर्यवंशी, सचिन खंडागळे, कीर्तिशील आचार्य, गंगाधर शेळके, यश घोडके, दत्ता उपाडे, सल्लाउद्दीन शेख, आदित्य कांबळे, विशाल कांबळे आदी सहभागी झाले होते.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी महासंघ आपले आंदोलन सुरूच ठेवील, असा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे रेणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीही धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती कृष्णा वाघमारे यांनी दिली.