शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक शांततेस धोका पोहचविणारा सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार

By राजकुमार जोंधळे | Updated: June 1, 2023 17:35 IST

विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई

लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. गर्जन उर्फ सिद्धांत उत्तम गायकवाड (रा. शिरूर अनंतपाळ) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, सन २००९ ते २०२१ या कालावधीत मारामारी करणे, दुखापत करणे, गैर कायद्याचे मंडळी जमून हाणामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्यासारखा गंभीर गुन्हा आदी विविध प्रकारची गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती. दरम्यान, आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार याच्याकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हे घडू नये, यासाठी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. 

२०२१ मध्ये पाठविला होता हद्दपारिचा प्रस्ताव...दरम्यान, २०२१ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आरोपीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, हद्दीपरीची कारवाई करण्यात आली आहे.

हद्दपारीच्या कारवाईसाठी यांनी केलाय पाठपुरावा..!पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी निलंगा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या हद्दपारिच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला. 

जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना दणका...या कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगाराला लातूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी विश्वासातील अट्टल, सराईत गुन्हेगाराला चांगलाच दणका बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर