नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे वैश्विकरणावर विभागीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:38+5:302021-02-16T04:20:38+5:30
दुसऱ्या सत्रात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये व शिक्षणाच्या वैश्विकरणातील आव्हाने’ या विषयावर मंदार शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. या ...

नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे वैश्विकरणावर विभागीय कार्यशाळा
दुसऱ्या सत्रात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये व शिक्षणाच्या वैश्विकरणातील आव्हाने’ या विषयावर मंदार शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. या सत्राचा समारोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागोराव कुंभार हे करणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये ‘सामूहिक संवाद व चर्चा’ होणार असून, विश्वनाथ तोडकर, माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. अनिल जायभाये, मनीषा तोकले आपल्या विषयांची मांडणी करणार आहेत. या सत्राचा समारोप माजी प्राचार्य माधवराव गादेकर हे करणार आहेत.
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये ही कार्यशाळा होणार असून, यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक बी.पी. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. अनिल जायभाये, श्रीराम वाघमारे, डॉ. संजय गवई, शिवदर्शन सदाकाळे, धनराज पवार, अक्षता सूर्यवंशी, प्रतिमा काळे, अंजली कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.