जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:43+5:302021-02-05T06:23:43+5:30
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव पाठवा लातूर- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत सूक्ष्म खाद्य उन्नयन ही योजना राबविली जाणार आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव पाठवा
लातूर- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत सूक्ष्म खाद्य उन्नयन ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेत जिल्ह्यासाठी एक, जिल्हा उत्पादन या बाबीखाली टोमॅटो या पिकासाठी मंजुरी दिली आहे. ही योजना २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, उत्पादक संस्था, बचत गटांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुभत्या जनावरांना वैरणीचे वाटप
लातूर - दुभत्या जनावरांना मोफत वैरणीचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषद, कृषी विभागाकडून वाटप होईल. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक कागदपत्रांसह १ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत संबंधित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज करता येणार आहेत. ३ मार्चनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा सोडतीसाठी विचार केला जाणार नाही, असे डॉ.आर.डी. पडिले यांनी कळविले आहे.