आरटीपीसीआरच्या १ लाख किटची मागणी नोंदविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:00+5:302021-04-09T04:20:00+5:30
ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपरुग्णालयांकडेही रॅपिड ॲन्टिजेन तसेच आरटीपीसीआर किट उपलब्ध आहेत. औषधी भांडार कक्षातून मागणी ...

आरटीपीसीआरच्या १ लाख किटची मागणी नोंदविली
ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपरुग्णालयांकडेही रॅपिड ॲन्टिजेन तसेच आरटीपीसीआर किट उपलब्ध आहेत. औषधी भांडार कक्षातून मागणी तसा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे टेस्ट करण्यासाठी कोणतीही अडचण होार नाही. दररोज तीन हजारांपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहेत. एका रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ चाचण्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार चाचण्या करण्यात येत आहेत.
४६ हजार ७१० डोसचा साठा
जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून, १७० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख ३१ हजार ६०९ जणांना लस देण्यात आली असून, ४६ हजार ७१० लसींचे डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्राला मागणीनुसार पुरवठा करण्यात आलेला आहे. दररोज पाच हजार डोस दिले जात आहेत. आठ ते नऊ दिवस पुरेल इतका साठा जिल्ह्यात आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.