जळकोट येथे रस्ता वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:51+5:302021-03-28T04:18:51+5:30
मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाबा घोणसे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जळकोट येथील महात्मा फुले चौक ...

जळकोट येथे रस्ता वाढविण्याची मागणी
मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाबा घोणसे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जळकोट येथील महात्मा फुले चौक ते बालाजी मंदिरापर्यंतचा रस्ता वर्दळीचा आहे. परिणामी, दोन्ही बाजूंनी गटारे, सर्व्हिस रोड आणि स्ट्रीट लाइटचे काम वाढवावे, अशी मागणी जळकोट येथील ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. यापूर्वी आम्ही उपजिल्हाधिकारी, उदगीर यांना निवेदन दिले आहे. या कामामुळे ग्रामस्थांसह भाविकांची सोय होणार आहे. जळकोट शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता नांदेड यांना सदरचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दस्तगीर वाहेद घोणसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, संग्राम नामवाड, राजकुमार डांगे, गोविंद भ्रमण्णा, नितीन धुळशेट्टे आदींच्या
स्वाक्षऱ्या आहेत.