वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:29+5:302020-12-06T04:20:29+5:30
लातूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ लातूर : शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शहरातील गंजगोलाई परिसरातून दोन ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
लातूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ
लातूर : शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शहरातील गंजगोलाई परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गांधीचाैक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सोबतच मार्केट यार्डच्या गेटसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
मनपाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत विविध संस्था व व्यावसायिकांसाठी स्वच्छता विषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे परीक्षण केले जाणार असून, सहभागी होण्यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. ८ डिसेंबर पर्यंत मनपा कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.
रात्रपाळी विजेमुळे शेतकऱ्यांची कसरत
लातूर : जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण होत असून पिकांना पाणी देण्यासाठी रात्रपाळी विजेमुळे शेतकऱ्यांची कसरत होत आहे. लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर आदी तालुक्यात रबीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
बसवंतपूर - नांदगाव रस्त्याची दुरवस्था
लातूर : शहरानजिक असलेल्या बसवंतपूर-नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्ते दुरूस्तीसाठी जि.प.बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
लाहोटी कन्या विद्यालयात कार्यक्रम
लातूर : श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात जागतिक एड्स निर्मुलन दिन साजरा करण्यात आला. यावेळी माया दुधारे, माहेश्वरी म्हेत्रे, रिशा कांबळे, गायत्री कंटेकर, प्रतीक्षा मंचरे, सुनिता बोरगावकर, सुनंदा कुलकर्णी, कमल खिंडे, लक्ष्मी कपाळे, निशा येळंबकर, श्रेया घारापूरकर उपस्थित होते.