मंजूर आरोग्य केंद्र मंगरुळ फाटा येथे उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:23+5:302020-12-06T04:20:23+5:30
जळकोट तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून नव्याने मंगरुळ- बोरगावनजीक प्राथमिक आरोग्य केंद्र विशेषबाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे. ...

मंजूर आरोग्य केंद्र मंगरुळ फाटा येथे उभारण्याची मागणी
जळकोट तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून नव्याने मंगरुळ- बोरगावनजीक प्राथमिक आरोग्य केंद्र विशेषबाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रासाठी साडेसहा कोटींची तरतूद डीपीडीसीतून करण्यात आली आहे. परंतु, मंगरुळ फाट्यापासून सदरील १३ गावे जवळ आहेत. त्यामुळे मंगरुळ फाट्यावर आरोग्य केंद्राची निर्मिती केल्यास या गावातील नागरिकांची गैरसाेय होणार नाही. मुख्य रस्त्यावर आरोग्य केंद्राची इमारत उभारल्यास रात्री- अपरात्री रुग्णांना आणण्यास मदत होणार आहे. वाहनासाठी रुग्णांना नातेवाईकांना फिरावे लागणार नाही. त्यामुळे प्रस्ताविक केंद्र मंगरुळ फाटा येथे उभारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी, सीईओ, आरोग्य संचालक, नायब तहसीलदारांना देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, चेअरमन धनराज पाटील, गंगाधर मुसळे, हनुमंतराव नागलगावे, रामेश्वर जाधव, सरपंच मनोहर वाकळे, संतोष कोसंबे, नगरसेवक रमाकांत रायेवार, रमेश चोले, मल्हारी भांगे, साहेबराव पाटील, रसूल शेख, ज्ञानेश्वर मुसळे, किशनराव चव्हाण, माधव कोठाळे, बळीराम सोनटक्के, बाळू शेट्टी, सूर्यकांत पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.