भाजीपाला बाजारसाठी स्वतंत्र जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:59+5:302020-12-05T04:31:59+5:30
एस.आर. मुळे, शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ येथील भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असते. परंतु भाजीपाला विक्रेत्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र ...

भाजीपाला बाजारसाठी स्वतंत्र जागेची मागणी
एस.आर. मुळे,
शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ येथील भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असते. परंतु भाजीपाला विक्रेत्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे अडचण होत आहे. तसेच सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील साकोळ येथे ५० वर्षांपासून भाजीपाला बाजार भरतो. येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला तसेच फळे विक्रीसाठी येतात. दर मंगळवारी सकाळी १० वा. सुरु होणारा भाजीपाला बाजार रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत असतो. सायंकाळी तर येथील बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असते. परंतु, भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे येथील महात्मा बसवेश्वर चौकातील मुख्य रस्त्यावर थांबावे लागत आहे. जागेअभावी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बाजारदिवशी बसला गावात प्रवेश नाही...
तालुक्यातील साकोळ येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. भाजीपाला बाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे गावात येणाऱ्या दुचाकी- चारचाकी वाहनांची अडचण होत आहे. बाजार दिवशी मोठी कसरत करीत मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, या दिवशी बसला गावात प्रवेश नसतो. त्यामुळे प्रवाशांना महात्मा बसवेश्वर चौकातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात चालत यावे लागते.
स्वतंत्र जागेची सोय करणार...
येथील भाजीपाला बाजारसाठी स्वतंत्र जागेची लवकर सोय करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीच्या माजी सभापती वर्षाताई भिक्का, सूर्यकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
***