समतानगरातील रस्ता करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST2021-02-25T04:24:44+5:302021-02-25T04:24:44+5:30
गत २५ वर्षांपासून हा रस्ता झाला नाही. परिणामी, स्थानिक नागरिकांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. हा मार्ग मुख्य रस्ता ...

समतानगरातील रस्ता करण्याची मागणी
गत २५ वर्षांपासून हा रस्ता झाला नाही. परिणामी, स्थानिक नागरिकांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. हा मार्ग मुख्य रस्ता असून, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर, दीनदयाल शाळा, संजय गांधी शाळा, इंदिरा सोसायटी तसेच पांदण रस्त्याला जोडणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी हाेत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेपही नागरिकांतून हाेत आहे. निवेदनावर माधव मोतीपवळे, विनोद तेलंगे, अविनाश शिंदे, बालाजी बिरादार, मलिकार्जुन मठपती, राम कोनाळे, दिगंबर घोडके, अशोक बिराजदार, प्रकाश महेंद्रकर, आकाश गुरणे, शंकर कदम, बंडू सुवर्णकार, योगेश बिरादार, श्याम सूर्यवंशी, अविनाश खेडवार, राम भुरे, चैतन्य कुंभार, हणमंतराव जाधव, बसवराज स्वामी, उमाकांत फुलारी, माधव पवार, व्यंकटी गुट्टे, जोतिराम मुंढे, व्यंकटराव पांचाळ, शिवराज सनगले, गुरुलिंग कन्नडे आदींची नावे आहेत.