ट्रान्सफार्म दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:05+5:302021-05-03T04:15:05+5:30

देवणी तालुक्यातील वागदरी येथील नागरिकांना सतत वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. सतत वीज गुल होत आहे. तोगरी- वागदरी ...

Demand to repair the transformer | ट्रान्सफार्म दुरुस्त करण्याची मागणी

ट्रान्सफार्म दुरुस्त करण्याची मागणी

देवणी तालुक्यातील वागदरी येथील नागरिकांना सतत वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. सतत वीज गुल होत आहे. तोगरी- वागदरी रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफार्मरची वाहिनी तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित लाईनमनला त्याची माहिती देऊन दुरुस्तीची मागणी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी, गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी, गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील सर्वच ट्रान्सफार्मर निकामी झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थेट कनेक्शन देण्यात येऊन वीजपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी, धोक्याची भीती व्यक्त होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वागदरीच्या सरपंच उषा होळसंबे यांनी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand to repair the transformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.