ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:55+5:302021-07-31T04:20:55+5:30
दीड वर्षांपासून कोरोनासंदर्भात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. परिणामी, ते ...

ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी
दीड वर्षांपासून कोरोनासंदर्भात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. परिणामी, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. निर्बंधांची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थचक्राला गती देण्याची गरज आहे. रेणापूर, मुरुड यासारख्या शहरात तसेच छोट्या गावात व्यवसाय, उद्योग सुरू झाले तर दिलासा मिळणार आहे.
त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करावेत. सर्व दुकाने, हॉटेल्स, भाजीपाला विक्रीची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. निर्बंधांच्या नावाखाली पोलिसांकडून व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी लातूर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, कपिल चितपल्ले, ॲड. निटुरे आदी उपस्थित होते.