चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:13+5:302021-03-21T04:19:13+5:30

औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची आदर्श शाळा म्हणून शासन परिपत्रकान्वये २६ ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आली होती. ...

Demand for filing a case against those who gave false reports | चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची आदर्श शाळा म्हणून शासन परिपत्रकान्वये २६ ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आली होती. त्याचबराेबर १ फेब्रुवारी २०२१ अंतिम यादीतही कायम होती. शासन परिपत्रकात नमूद केलेल्या सर्व नियम/अटी आणि निकष आमची शाळा पूर्ण करीत असतानाही संबंधितांनी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर तपासणी करून चुकीचा अहवाल सादर केला आहे. यातून नांदुर्गा शाळेला अपात्र ठरविण्यात आले. औसा तालुक्यातील इतर शाळा पात्र असल्याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. यातून नांदुर्गा येथील शाळेचे नाव डावलून अन्याय करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला १० मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. अद्यापही यावर कारवाई झाली नाही. परिणामी, शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार निकष आणि अटीची पूर्तता केंद्रीय प्राथमिक शाळा करते किंवा नाही, याबाबत इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या वतीने तातडीने चौकशी करण्यात यावी, नांदुर्गा शाळेस न्याय देण्यात यावा, त्याचबरेाबर चुकीचा अहवाल देणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवार्ई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Demand for filing a case against those who gave false reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.