पानगाव येथील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:44+5:302021-03-08T04:19:44+5:30
पानगाव हे जिल्ह्यातील संवेदनशील गाव आहे. येथील पोलीस चाैकीच्या हद्दीतील गावात राजरोसपणे मोबाईल मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गावठी ...

पानगाव येथील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी
पानगाव हे जिल्ह्यातील संवेदनशील गाव आहे. येथील पोलीस चाैकीच्या हद्दीतील गावात राजरोसपणे मोबाईल मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गावठी दारू, गांजा, गुटका, आदी अवैध व्यवसाय सुरू आहेत. परिणामी, याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचा आराेप ग्रामस्थांतून हाेत आहे.
पानगावातील अवैध व्यवसाय बंद करावेत, अन्यथा पानगाव बंद ठेवण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राम बच्चेवार, उद्धव हानवते, अर्जुन राजपूत, डॉ. नागरगोजे, बालाजी चिंताकोटे, रामराव बोराडे, भारत सौदागर, संजय कांबळे, धर्मराज संपते, डॉ. एस. आर. शेख, अविनाश चव्हाण, डॉ. मोकाशे, भानुदास आचार्य, विठ्ठल आचार्य, सिदलीगआपा हालकुडे, रतन तोष्णीवाल, राजू बलदवा, केशव हरिदास, जुबेर माणियार, सूरज मोटाडे, जयराम कस्तुरे, कचरू सूळ, विवेक भंडारे, उमर पठाण, गजानन फुलारी, आयुब पठाण यांच्यासह जवळपास ३०० महिला पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.