तीस हजारांच्या लाचेची मागणी; महावितरण अभियंत्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:07+5:302021-07-01T04:15:07+5:30

लातूर येथील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज प्रवासहाचा वापर करून विजेची चाेरी केल्याची प्रकरण ...

Demand a bribe of thirty thousand; Crime against MSEDCL Engineer | तीस हजारांच्या लाचेची मागणी; महावितरण अभियंत्याविरुद्ध गुन्हा

तीस हजारांच्या लाचेची मागणी; महावितरण अभियंत्याविरुद्ध गुन्हा

लातूर येथील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज प्रवासहाचा वापर करून विजेची चाेरी केल्याची प्रकरण घडले. याबाबत कारवाई न करण्याच्या कामासाठी महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार हाॅटेलचालकाने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निषन्न झाले. लातूर शहरातील नांदेड राेडवरील गरुड चाैकात असलेल्या महावितरणच्या कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार आणि बुधवारी सापळा लावला. यावेळी तक्रारदार हाॅटेलचालक वीजग्राहकाने सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात गेले हाेते. मात्र, संशय आल्याने ३० हजारांची लाच स्वीकारण्यास सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने जाणीवपूर्वक टाळाळाट केली.

याबाबत लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याच्याविराेधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांनी दिली.

सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पाेलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, पाेलीस हवालदार लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दीपक कलवले, रुपाली भाेसले, राजू महाजन यांच्या पथकाने केली.

Web Title: Demand a bribe of thirty thousand; Crime against MSEDCL Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.