ग्रामसेवकाचे पदनाम पंचायत विकास अधिकारी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:30+5:302021-06-19T04:14:30+5:30
गाव छोटे असो अथवा मोठे प्रत्येक गावात तेवढीच कामे असतात. त्यामुळे छोटा तलाठी व मोठा तलाठी असे पद महाराष्ट्रात ...

ग्रामसेवकाचे पदनाम पंचायत विकास अधिकारी करण्याची मागणी
गाव छोटे असो अथवा मोठे प्रत्येक गावात तेवढीच कामे असतात. त्यामुळे छोटा तलाठी व मोठा तलाठी असे पद महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. गावाचा प्रमुख हा सरपंच असतो व ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. परंतु, गावातील शिक्षक, तलाठी लाइनमॅन, कृषी सहायक, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी हे ग्रामसेवकाचे पद मोठे नसल्याने ग्रामसेवकाचे ऐकत नाहीत.
तसेच सरपंचाचेही ते ऐकत नाहीत. इतर कर्मचारी कामे करीत नसल्याने गावांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामसेवक या पदाचे नामाभिधान हे पंचायत विकास अधिकारी असे करण्यात यावे. दर पंधरा दिवसांनी गावातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांना देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.