साकोळातील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:02 IST2021-01-08T05:02:50+5:302021-01-08T05:02:50+5:30

तालुक्यातील साकोळ येथील प्रभाग क्र. ६ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचा प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे. ...

Delete the encroachment in the sky | साकोळातील अतिक्रमण हटवा

साकोळातील अतिक्रमण हटवा

तालुक्यातील साकोळ येथील प्रभाग क्र. ६ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचा प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु अद्याप अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने या प्रभागातील मतदारांनी आगामी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अनंत डोंगरे, सतीश माळी, राजकुमार डोंगरे, वीरभद्र दरेकर, विमल गुरणे, कांताबाई माळी, श्रीदेवी डोंगरे, मुनेरा बागवान, शमीन तांबोळी यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे साकोळच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बीडीओंना सूचना

साकोळच्या प्रभाग क्र. ६ मध्ये जवळपास १,३५० मतदार आहेत. प्रभागातील मतदारांच्या या पवित्र्याबद्दल तहसीलदार अतुल जटाळे म्हणाले, अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामपंचायत विभागाशी निगडित असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाहणी करून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Delete the encroachment in the sky