यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद सोळुंके, अरविंद पाटील निलंगेकर, कोविड समन्वयक भाग्यश्री काळे यांची उपस्थिती होती.
दहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनपैकी लातूरसाठी दोन तर निलंगा, देवणी, जळकोट आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यासाठी ८ मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या काळात नागपूर आरोग्य पॅटर्न तयार केला. हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. रेमडीसिविरच्या कारखान्याची निर्मिती नागपुरात केली. तर विदर्भात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी तयारी चालू आहे. भविष्यात ऑक्सिजन ची कमतरता पडू नये यासाठी खबरदारी घेत हे प्लांट उभा करण्यात येत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी हे विकासाचे महापुरुष म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील ऑक्सिजन मशीन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यासाठी लातूरसाठी २ व निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळसाठी ८ मशीन उपलब्ध करून गुरुवारी अक्का फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यापूर्वी निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी १५ मशीन दिल्या आहेत. यावेळी डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ. किरण बाहेती, डॉ. ज्ञानेश्वर कदम, दगडू सोळुंके आदींची उपस्थिती होती.
लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग...
लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढू शकते. याबाबत आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लहान मुलांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागांची उभारणी केली जात असून चार दिवसात हा विभागही सज्ज करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे १०० बेडच्या नवीन इमारतीचे काम प्रगतिपथावर असून त्यासाठी संलग्न ऑक्सिजन प्लांट निर्मिती करणार असल्याचे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले.