जळकोटसाठी डेडीकेट हॉस्पिटल सुरु करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:41+5:302021-04-13T04:18:41+5:30
जळकोट शहरात तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जळकोट शहरात केवळ कोविड केअर सेंटर सुरू आहे. ते फुल्ल झाल्याने आता ...

जळकोटसाठी डेडीकेट हॉस्पिटल सुरु करावे
जळकोट शहरात तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जळकोट शहरात केवळ कोविड केअर सेंटर सुरू आहे. ते फुल्ल झाल्याने आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही ठिकाणच्या सेंटरमध्ये गोळ्या- औषधांशिवाय काहीही दिले जात नाही. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा आहे. मात्र, कोविड केअर सेंटरमध्ये नावालाच ही सुविधा आहे. एखादा रुग्ण गंभीर झाल्यास मोठी अडचण होत आहे.
या ठिकाणी व्हेंटिलेटर नाही. तसेच सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नाही. तसेच तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना उदगीर, लातूरला पाठवावे लागत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये डेडीकेट हॉस्पिटल आहेत. त्यामुळे तिथे आवश्यक त्या सुविधा मिळतात. मात्र, येथे रेफर केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून डीसीएच हॉस्पिटल सुरू करावे. तिथे व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी. सिटीस्कॅन मशिन बसविण्यात यावी. तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णांची अडचण दूर करावी...
जळकोट येथे विशेष बाब म्हणून डेडीकेट हॉस्पिटल सुरु करावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, सूर्यकांत धुळशेट्टे, खादरभाई लाटवाले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, नगरसेवक शिवानंद देशमुख, महेश धुळशेट्टे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, धनंजय भ्रमण्णा, संग्राम कदम, अजिज मोमीन, गोपाळकृष्ण गबाळे, ॲड. तात्यासाहेब पाटील, नागनाथ शेटे, नामदेव शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, सलीम बागवान आदींनी केली आहे.