वलांडी : येथील सुलोचना धुळप्पा मठपती (वय ८२) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
तुकाराम बनसोडे
वलांडी : येथील तुकाराम किसनराव बनसोडे (वय ७८) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
हाळी शिवारात वीज कोसळून जनावरे दगावली
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा व तासभर पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून शेतातील जनावरांचा मृत्यू झाला. हाळी शिवारात शिवाजी शंकरराव काळे यांचा बैल व चाँदपाशा शेख यांची म्हैस दगावली.