शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; आता २५ लाख मिळणार, हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:42 IST

शासनाकडून वारसदारास देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे

लातूर : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणीही जखमी, जायबंदी अथवा मृत्यूमुखी पडल्यास मदतीपोटी देण्यात येणाऱ्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. विशेषत: बिबट्याच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती दगावल्यास आता २५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील काही गावांत बिबट्या दिसून येतो. यंदा तर उदगिरातील मानवी वस्तीत बिबट्या आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याच्या शोधासाठी वन विभागाने पथके तयार केली आहेत. ड्रोन कॅमेराच्या आधारे बिबट्याचा ठावठिकाणा शोधला जात आहे. मात्र, अद्यापही बिबट्या सापडला नाही. या घटनेमुळे नागरिकांत दहशत वाढली आहे.

दरम्यान, यापूर्वी बिबट्या श्वान, शेळीची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आजपर्यंत ऊस क्षेत्राच्या भागातच बिबट्या काही शेतकऱ्यांना आढळला आहे. त्याची वन आणि महसूल विभागाला तत्काळ माहिती देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्याबरोबर जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे.

२० ऐवजी आता २५ लाख मिळणार...बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला वन विभागाच्या वतीने २० लाख रुपयांची भरपाई देण्यात येत होती. आता २५ लाख मिळणार आहेत.

बिबट्या सर्वाधिक आढळला या भागात...साधारणत: बिबट्या ऊस क्षेत्र भागात आढळून येत आहे. जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, अहमदपूर भागात सर्वाधिक वेळा बिबट्या आढळून आला आहे.

या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत...बिबट्या, वाघ, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, हत्ती, लांडगा अशा प्राण्यांकडून हल्ला झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते.

जखमी/ अपंगत्व आल्यास मदत मिळते का?...बिबट्याच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास पाच लाखांची, गंभीर जखमी झाल्यास एक लाख २५ हजारांची मदत मिळत असे. आता जायबंदी झाल्यास साडेसात लाखांची मदत मिळते. किरकोळ जखमी असल्यास औषधोपचार करण्याचा खर्च मिळतो.

हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल...वन्य प्राण्याने हल्ला केल्यास वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती देता येते. शिवाय, वन विभागासही माहिती देता येते. त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करतात.

वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी...मृताच्या जवळच्या वारसदाराच्या नावे भरपाईचा धनादेश देण्यात येतो. तसेच बँक खात्यावर वारसाच्या नावाने एफडी केली जाते.

वन विभाग सतर्क, नागरिकांत जागृती...सुदैवाने गत अकरा महिन्यांत वन्य प्राण्यांचा लातूर परिमंडळात एकही हल्ला झाला नाही. बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच वन विभाग सतर्क होऊन नागरिकांत जनजागृती करीत आहे.

वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास भरपाई...वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणीही गंभीर जखमी, जायबंदी झाल्यास अथवा मृत्यूमुखी पडल्यास वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. घडलेल्या घटनेची जखमी अथवा दगावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वन विभागास किंवा टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.- एन. एस. बिराजदार, वन परिमंडळ अधिकारी, लातूर.

टॅग्स :leopardबिबट्याlaturलातूरforest departmentवनविभाग