दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:45+5:302021-03-15T04:18:45+5:30
फिर्यादी बळिराम खंडेराव सोनटक्के व हरिश्चंद्र शंकरराव गायकवाड (वय ४६, रा. काळेगाव, ता. अहमदपूर) हे दुचाकी (एमएच १२ बीवाय ...

दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू
फिर्यादी बळिराम खंडेराव सोनटक्के व हरिश्चंद्र शंकरराव गायकवाड (वय ४६, रा. काळेगाव, ता. अहमदपूर) हे दुचाकी (एमएच १२ बीवाय ०७७०)वरून जात असताना १९ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालवून जोराची धडक दिली. या घटनेत बळिराम सोनटक्के (रा. विकास नगर) यांच्या पायाला मार लागला, तर हरिश्चंद्र गायकवाड यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. यावेळी घटनास्थळी आलेल्या मित्रांनी त्या दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यात फिर्यादीस कमी मार लागला होता, त्यामुळे प्रकृती बरी होताच त्यांनी पोलिसांना जबाब दिला. मात्र, हरिश्चंद्र गायकवाड यांना गंभीर मार लागल्याने उपचार सुरू असताना २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बळिराम सोनटक्के यांनी दिलेल्या जबाबावरून अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात दुचाकीचा क्रमांक निष्पन्न झाला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.