डीसीपीएस कपातीचा हिशोब द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:32+5:302021-04-21T04:20:32+5:30
मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तानाजी सोमवंशी, तुळशीदास धडे, माधव होनराव, ...

डीसीपीएस कपातीचा हिशोब द्यावा
मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तानाजी सोमवंशी, तुळशीदास धडे, माधव होनराव, लक्ष्मण बेंबडे, नवनाथ जाधव आदींनी निवेदन दिले आहे. एनपीएस योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मयत झाल्यास या योजनेत कोणता लाभ मिळणार?, ही योजना शेअर मार्केटवर आधारित असल्याने कर्मचा-यांच्या रक्कमेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असे सवाल करण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबर २००५ पासून आजतागायत झालेल्या डीसीपीएस योजनेतील खात्याचे विवरण जुलै २००७ मधील पध्दतीनुसार कर्मचा-यांना देण्यात यावे. या योजनेतील मृत व सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबियांना शासनाकडून कोणताही लाभ देण्यात येत नसून यापुढे शासन या कर्मचा-यांना कुठला लाभ देणार? याबाबत स्पष्टता देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.