अंधोरीत उघड्यावरील डीपीमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:15+5:302021-08-20T04:25:15+5:30
अर्बन बँकेत स्वातंत्र्यदिन साजरा अहमदपूर : शहरातील महेश अर्बन बँक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांच्या हस्ते ...

अंधोरीत उघड्यावरील डीपीमुळे धोका
अर्बन बँकेत स्वातंत्र्यदिन साजरा
अहमदपूर : शहरातील महेश अर्बन बँक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती शिवानंद हेंगणे, संचालक ॲड. भारतभूषण क्षीरसागर, मुजीब पटेल जहागीरदार, डी.के. जाधव, सरव्यवस्थापक बी.के. क्षीरसागर, शिवाजीराव देशमुख, विनोद चिलकेवार, सुरेश शेळके, प्रदीप उगीले, बाबुभाई रुईकर, तानाजी राजे, सतीश नवटक्के, प्रशांत भोसले, फिरोज शेख, सलिम शेख, अहमद तांबोळी आदींची उपस्थिती होती.
प्रिंटीग क्लस्टरच्यावतीने वृक्षलागवड
उदगीर : येथील अॕग्रो पॕॅकेजिंग अँड प्रिटिंग क्लस्टर या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून २०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, संस्थाध्यक्ष भाऊसाहेब बिरादार, भास्कर कुलकर्णी, महेश बिरादार, सांब सनगले, विनोद सुतार, माधव हलगरे, प्रदीप पाटील, अभंगराव पाटील, बालाजी येरोळे, दयानंद होन्न, गणेश अपसिंगेकर, बालाजी भोईनवाड, अंकुश वारकरे, कप्पीकेरे आदींची उपस्थिती होती.
अहमदपूर बसस्थानकास ५१ वृक्षांची भेट
अहमदपूर : येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बसस्थानकामध्ये कर्मचारी जीवन कांबळे यांच्या वतीने ५१ वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक एस.जी. सोनवणे, स्वराज्य मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे, गजानन सोमवंशी, नंदकिशोर पाटील, किरण शेळके, इस्माईल सय्यद, अर्जुन पाटील आदींसह बसस्थानकातील कर्मचारी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती स्वातंत्र्य दिन
अहमदपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य प्रशासक शिवानंद हेंगणे यांच्या हस्ते ध्वाजारोहन करण्यात आले. यावेळी सचिव आर.बी. भुतडा, बी.बी. केंद्रे, तुकाराम जाधव, ॲड. हेमंत पाटील, विकास महाजन, सिराजोद्दीन जागीरदार, सुंदर साखरे, सलीम सय्यद, दिलीप जाधव, अनिल मेनकुदळे, भारत सांगवीकर, आर.डी. कासले, ओ.बी. उगीले, एस.सी. स्वामी, एस.एन.केंद्रे, एम.एम. बेंबडे, एस.एच. मुरुडकर, एम.आर. शेख, एम.एन. जोंधळे यांची उपस्थिती होती.