तुरीचे नुकसान; चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:03+5:302021-01-04T04:18:03+5:30
लातूर शहरातून लाखाचे ड्रायफ्रुटस् चोरीला लातूर : शहरातील डालडा फॅक्टरी परिसरात ...

तुरीचे नुकसान; चौघांविरुद्ध गुन्हा
लातूर शहरातून लाखाचे ड्रायफ्रुटस् चोरीला
लातूर : शहरातील डालडा फॅक्टरी परिसरात पीकअप वाहन (एमएच-२४, एव्ही-४२९) उभे करून चहा पिण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनातील ड्रायफ्रुटस् (किंमत १ लाख ६ हजार) लंपास केल्याची घटना घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात संजय साधू गुजारे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजी दिवसभर शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
विद्युत मोटारींची चोरी
लातूर : शेतात विहिरीवर असलेल्या दोन मोटारी व इतर साहित्य अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना लामजना शिवारात २९ ते ३० डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात अजमोद्दीन खय्युम शेख (४९, रा. लामजना, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उस्तुर्गे करीत आहेत.
बाजारात मोबाईल चोरी
लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे भरलेल्या आठवडी बाजारात फिर्यादीसह इतर सहा जणांचे मोबाइल अज्ञातांनी पळविल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर चंद्रकांत परसगावे (३८, रा. किल्लारी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मोबाइल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढले आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
लातूर : शहरातील बौद्धनगर येथे असलेल्या वैशाली बुद्धविहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास भन्ते रत्नपाल (वर्धा), कुमार सोनकांबळे, अशोकराव सातपुते, सूर्यभान लातूरकर, विजय मस्के, अरविंद दमावले, मीना सुरवसे, लताबाई चिकटे, जगन्नाथ सुरवसे, केशव कांबळे यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती. प्रारंभी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.