मोटेगाव येथे नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:12+5:302021-09-12T04:24:12+5:30

मोटेगाव व वांगदरी परिसरात शासनाकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे. या सज्जाचे तलाठी तिडके व कर्मचारी पाहणी करत आहेत. ...

Damage inspection at Motegaon | मोटेगाव येथे नुकसानीची पाहणी

मोटेगाव येथे नुकसानीची पाहणी

मोटेगाव व वांगदरी परिसरात शासनाकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे. या सज्जाचे तलाठी तिडके व कर्मचारी पाहणी करत आहेत. दाने यांनी यादरम्यान त्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांसोबत पाहणीही केली. अनेक शेतकऱ्यांचा ऊस पावसामुळे आडवा झालेला आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साठलेले असून जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. मूग व उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. पाहणी झाल्यानंतर हा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाणार असल्याची माहिती तलाठी तिडके यांनी दिली. यावेळी मल्लिकार्जुनअप्पा हलकंचे, माऊली पवार, प्रसाद हलकंचे, शेतकरी मोहन पवार, तानाजी पवार, गणेश पवार, राजकुमार पवार, सर्जेराव सोमवंशी, विकास सोमवंशी, वांगदरीचे विकास मोकाशे यांच्या शेतात नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी बंटी मोटे, मनोरथ सोमवंशी, गणेश सोमवंशी, हणमंत पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Damage inspection at Motegaon