पानगाव परिसरात संचारबंदी लागू (दिल्ली आवृत्तीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:31+5:302020-12-06T04:20:31+5:30
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यस्मारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर ...

पानगाव परिसरात संचारबंदी लागू (दिल्ली आवृत्तीसाठी)
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यस्मारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे दरवर्षी अनुयायांची गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान, यापूर्वीच चैत्य स्मारकाचे अध्यक्ष व्ही. के. आचार्य यांनीही आंबेडकरी अनुयायांना येथे अभिवादनासाठी गर्दी करु नये. आपल्या घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी पानगाव, पाथरवाडी, फावडेवाडी, नरवाडी, रामवाडी, इनामवाडी या परिसरामध्ये कलम १४४ व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याने, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संचारबंदी आदेश लागू केले आहेत. पानगाव येथील चैत्य स्मारकावर अभिवादनासाठी अनुयायांनी जाण्याऐवजी घरातून अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.