शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

निलंगा शहरानजीकच्या शेततळ्यात आढळली मगर, अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश

By राजकुमार जोंधळे | Updated: February 15, 2024 02:09 IST

...मगर माेठी असल्याने त्यांना आवरत नव्हती. बऱ्याचदा त्यांच्या हातातून निसटत होती.

निलंगा (जि. लातूर) : शहरातील उदगीर मोड परिसरातील शेतात शेततळ्यामध्ये चक्क ९ फूट लांबीची, २०० किलो वजनाची मगर शेततळ्यात आढळली. त्यास बुधवारी रात्री दहा वाजता वनविभाग, वन जीवरक्षक टीमने पकडून निलंगा येथील वन उद्यानातील तळ्यात ठेवले आहे.

उदगीर मोड परिसरात येथील उद्योजक संजय हालगरकर यांच्या शेतात शेततळे असून, बुधवारी दुपारी शेतात काम करणारे कासिम शेख यांना पाण्यात काहीतरी मोठा प्राणी असल्याचा संशय आला. यावरून त्यांनी वन जीवरक्षक टीमशी संपर्क साधला. जवळपास दोन तासांच्या निरीक्षणानंतर मगर असल्याचे वन जीवरक्षक टीमच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वनविभागाला पाचारण केले. दुपारी तीन वाजल्यापासून शेततळ्यातील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. चार तासानंतर मगरीचे दर्शन झाले. अवाढव्य मगरीला बघून भीती वाटली. घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी केली हाेती. निलंगा येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ, विनोद हेबाडे, गुंडेराव सूर्यवंशी, बुलबुले यांचे पथकही दाखल झाले. सायंकाळी आठ वाजतापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. रात्री दहा वाजता अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले.

यावेळी वन्यजीव रक्षक मित्र प्रमोद पुरी, भीमाशंकर गाढवे, सिद्धार्थ चव्हाण, अमोल माने, हनुमंत पाटील, गणेश देशमुख, शुभम पाटील, मुजम्मिल सित्तारी, वाहेब सितारी, विकास कांबळे, वनरक्षक सोपान बडगणे, वनसेवक चक्रधर तेलंग, ज्ञानदेव जाधव, पिराजी पिटले, काळू तेलंग, आदिनाथ रोड्डे आदींनी मगरीला पकडले. शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनीही रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत केली.

दाेन तासांच्या प्रयत्नानंतर मगरीला दाेरीने बांधण्यात यश -मगर मोठी असल्याने दहा ते बारा जणांनी प्रयत्न करून तिला दाेर बांधला; मात्र मगर माेठी असल्याने त्यांना आवरत नव्हती. बऱ्याचदा त्यांच्या हातातून निसटत होती. शेततळ्यातून वाहनापर्यंत घेऊन जाताना दोन ते तीन वेळेला तोल गेला; मात्र वन जीवरक्षक टीमने मगरीला पकडून नेले. विशेष म्हणजे, या शेततळ्यालगत नवीन वसाहत असून, वेळीच प्रसंगावधानाने मगरीला पकडण्यात आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल