रस्त्यावर चालू स्थितीत ऑटो उभे केल्याने चौघा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST2020-12-23T04:16:49+5:302020-12-23T04:16:49+5:30

दुसरी घटना विवेकानंद चौक परिसरातच घडली. एमएच २४ एटी ०६८७ या क्रमांकाचा ऑटो चालू स्थितीत रस्त्यावर उभा होता. लोकांच्या ...

Crime against four persons for parking an auto on the road | रस्त्यावर चालू स्थितीत ऑटो उभे केल्याने चौघा जणांविरुद्ध गुन्हा

रस्त्यावर चालू स्थितीत ऑटो उभे केल्याने चौघा जणांविरुद्ध गुन्हा

दुसरी घटना विवेकानंद चौक परिसरातच घडली. एमएच २४ एटी ०६८७ या क्रमांकाचा ऑटो चालू स्थितीत रस्त्यावर उभा होता. लोकांच्या जीवितास धोका व हरकत निर्माण केल्याने याबाबत सदर ऑटो चालकाविरुद्ध पोना. रामलिंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यातत आला आहे.

तिसरी घटना गरुड चौक परिसरात घडली. चालू स्थितीत ऑटो उभा करून लोकांच्या जीवितास धोका व हरकत निर्माण केल्यावरून एमएच २४ एपी ०३५१ या क्रमांकाच्या ऑटो चालकाविरुद्ध पोना. संजय कांबळे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

अन्य एक घटना गरुड चौक परिसरातच घडली. एमएच २४ एटी २०९७ या क्रमांकाचा ऑटो चालू स्थितीत रस्त्यावर उभा होता. याबाबत पोना. संजय कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर ऑटो चालकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Crime against four persons for parking an auto on the road