आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:30+5:302021-07-19T04:14:30+5:30
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील किल्ला गल्ली भागात राहणारी मयत विवाहिता मलेका रफिक शेख (२१) हीस आरोपी पती रफिक ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांवर गुन्हा
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील किल्ला गल्ली भागात राहणारी मयत विवाहिता मलेका रफिक शेख (२१) हीस आरोपी पती रफिक अल्लाबक्ष शेख, सासू नजमुन्निसा ऊर्फ बेगमबी अल्लाबक्ष शेख, अतिक अल्लाबक्ष शेख, शफिक अल्लाबक्ष शेख आणि मेहराजबी अतिक शेख यांनी संगनमत करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन सतत मारहाण केली, तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार मयत विवाहितेच्या भावाने उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पाच आरोपींविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव एडके यांनी सांगितले.