शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चारित्र्यसंपन्न पिढीकडून राष्ट्राची उभारणी, डॉ. एस. एन. सुब्बाराव यांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:43 PM

केवळ भौतिक साधनसामुग्री म्हणजे राष्ट्राचा विकास नाही. बुलेट ट्रेन ही काळाची गरज असली, तरी भूक, भ्रष्टाचार, नशा आणि हिंसा संपविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

लातूर : केवळ भौतिक साधनसामुग्री म्हणजे राष्ट्राचा विकास नाही. बुलेट ट्रेन ही काळाची गरज असली, तरी भूक, भ्रष्टाचार, नशा आणि हिंसा संपविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. चारित्र्य आणि शारीरिक विकासावरच राष्ट्राची उभारणी होईल, असे मत राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी येथे व्यक्त केले.विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने १९ वा राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात सुरू आहे. याप्रसंगी ते लोकमतशी बोलत होते. देशातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती, राहणीमानातील विविधता आणि विधितेतून राष्ट्राची एकता हा या बालमहोत्सवाचा उद्देश आहे असे सांगत डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले, केवळ बोलून एकतेचा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी कृती करावी लागणार आहे.यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले. देशातल्या विविधेतून एकता साध्य करायची असेल तर सरकारच्या प्रतिनिधींनी लातुरातील हा बालमहोत्सव पाहिला पाहिजे. केरळ राज्यामध्ये श्रम करताना दिल्लीतील शास्त्री भवनातून टेलिफोन आला, मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले की तुमचे नाव पद्म अ‍ॅवॉर्डसाठी घेण्यात आले आहे. त्यावेळी मी त्यांना पद्म अ‍ॅवॉर्ड नको असे सांगितले.त्यानंतर तामिळनाडूचे मंत्री एम.जी. रामचंद्रजी यांचे नाव पुरस्कारासाठी पुढे आले. सिनेमावाल्यांना असे अ‍ॅवॉर्ड दिले जात असेल तर त्यांच्या रांगेत मला थांबायचे नाही असे ठणकावून सांगितले. हे बालक माझे पद्म अ‍ॅवॉर्डच आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्रव्यवहार केला, त्यावेळी मंत्री महावीर त्यागी आणि डॉ.व्ही.के.आरव्ही राव यांनी एनएसएस व एनसीसीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आणि पहिला महोत्सव सेवाग्राम येथे झाला. एनएसएसमध्ये सक्तीची सेवा नाही तिथे स्वयंअनुशासन आहे. तर एनसीसीमध्ये सक्तीने अनुशासन केले जाते आणि आमच्या बाल महोत्सवातही स्वयंअनुशासन आहे. विविधतेतून एकता साध्य करण्याचा बाल महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. एकतेची शिस्त या बाल महोत्सवात मिळते, असेही सुब्बाराव म्हणाले.जय जगत् पुकारे जा..सुब्बाराव म्हणाले, भारतासह जगातील २५ देशांमध्ये भ्रमण केले. यूनोमध्ये शांतता या विषयावर व्याख्यान दिले. सहभागी झालेल्या जगभरातील १४०० तज्ज्ञांनी पुस्तकी ज्ञानावर भर दिला. पण आम्ही प्रत्यक्ष कृतीतील अनुभवावर तिथे व्याख्यान दिले आणि ते यूनोमधील सहभागी तज्ज्ञांना आवडले. याच कार्यक्रमात जय जगत्, जय जगत्.. पुकारे जा.. सिर अमन पे वारे जा.. सबके हितके वास्ते, अपने सूख बिसारे जा...ह्ण, ह्यप्रेम की पुकार हो, सबका सबसे प्यार हो.. जीत हो जहानकी, क्यों किसीकी हार हो.. हा विश्वव्यापी विचार दिला आणि तो जगाला भावला, असेही डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले.