कासार बालकुंदा परिसरातील तलावाच्या पाळूला गेला तडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST2021-02-28T04:37:46+5:302021-02-28T04:37:46+5:30
याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. ...

कासार बालकुंदा परिसरातील तलावाच्या पाळूला गेला तडा
याकडे संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने यंदा मात्र, पाळूला तडा गेला आहे. परिणामी, भविष्यात हा तलाव फुटण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या कासार बालकुंदा हा परिसरा डाेंगराळ भाग आहे. या परिसरात शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने १९७२ साली माेठ्या क्षमतेच्या तलावाची निर्मिती करण्यात आली. अलीकडे या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. तलावाच्या पाळूची रुंदी अधिक असल्याने पाळूवरच माेठमाेठी झाडे उगवली आहेत. या उगवलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळूलाच आता तडा गेला आहे. भेगा पडल्या आहेत. पाळूला तडा गेल्याने पाळूवरून पलीकडच्या शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांनी माेठी आडचण झाली आहे. तसेच सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. सांडव्यांची भिंतही पाणी झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाळूची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून हाेत आहे.
दुरुस्तीसाठी प्रयत्न करू...
याबाबत अभियंता मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, तलावाच्या पाळूचे फोटो मिळाले आहेत. याबाबत लवकरात लवकर दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील. सिकंदर शेख म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. पाळूच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाला चार महिन्यांपूर्वी कळविण्यात आले आहे. असे असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे समाेर आले आहे.