कोविड स्थिती गंभीर वळणावर; सावध व्हा, अन्यथा लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST2021-03-23T04:20:56+5:302021-03-23T04:20:56+5:30

रेस्टॉरंट व वाहन चालकांना दंड आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक विनामास्क दिसल्यास संबंधित ग्राहकासह रेस्टॉरंट मालकावर दंड आकारला जाईल. ऑटोरिक्षा, टॅक्सी, ...

Covid's condition at a critical juncture; Be careful, otherwise lockdown! | कोविड स्थिती गंभीर वळणावर; सावध व्हा, अन्यथा लॉकडाऊन!

कोविड स्थिती गंभीर वळणावर; सावध व्हा, अन्यथा लॉकडाऊन!

रेस्टॉरंट व वाहन चालकांना दंड

आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक विनामास्क दिसल्यास संबंधित ग्राहकासह रेस्टॉरंट मालकावर दंड आकारला जाईल. ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रॅव्हल्समध्ये विनामास्क प्रवासी दिसल्यास वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवाशांकडूनही दंड वसूल केला जाईल. या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

घाबरू नका; नियम पाळा

रुग्णसंख्या वाढत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, नाहीतर लॉकडाऊन करावा लागेल, अशी स्थिती आहे. नागरिकांनी घाबरू नये. नियम पाळावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. फेसबुक लाईव्हला मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांची उपस्थिती होती.

Web Title: Covid's condition at a critical juncture; Be careful, otherwise lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.