हुलसूर येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:47+5:302021-06-09T04:24:47+5:30
यावेळी पालकमंत्री प्रभू चव्हाण, आ. शरणू सलगर, जिल्हा पंचायत सदस्य सुधीर कडादी, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिल भुसारे, माजी ...

हुलसूर येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार
यावेळी पालकमंत्री प्रभू चव्हाण, आ. शरणू सलगर, जिल्हा पंचायत सदस्य सुधीर कडादी, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिल भुसारे, माजी जि. प. उपाध्यक्ष लता हारकुडे, सूर्यकांत चिलाबट्टे, डीवायएसपी सोमलिंग कुंबारा, तहसीलदार शिवानंद म्हेत्रे, तालुका पंचायतचे अधिकारी खालिद अली, डॉ. विष्णुकांत, डॉ. आरिफुद्दीन, डॉ. प्रताप बिरादरा, डॉ. शशिकांत कनाडे, चंद्रकांत देटणे, सोमनाथ आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री प्रभू चव्हाण म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये. कोविड लस महत्त्वाची असून ती घ्यावी. तिसऱ्या लाटेस रोखण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांनी तत्काळ उपचार घ्यावेत, असेही ते म्हणाले.
जि. प. सदस्य सुधीर कडादी म्हणाले, काेरोनाची लक्षणे जाणवू लागताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, असेही ते म्हणाले.