हंडरगुळी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:07+5:302021-03-09T04:22:07+5:30
आरोग्य विभागाकडून तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. सोमवारी हंडरगुळी येथील आरोग्य केंद्रात लसीकरणास ...

हंडरगुळी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण
आरोग्य विभागाकडून तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. सोमवारी हंडरगुळी येथील आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रारंभी लाभार्थ्यांची आनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर, लस देण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना काही वेळ विश्रांती घेण्यासाठी निगराणी कक्ष तयार करण्यात आला आहे.
आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे दिवस लसीकरणासाठी ठेवण्यात आले आहेत. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना व ४५ ते ६० वयोगटांतील बीपी, शुगर, किडनीचे व अन्य आजार असलेल्या नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे, शिवाय आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनाही लसीकरण केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे, विस्तार अधिकारी एस.एन.चव्हाण यांनी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश पवार, डाॅ.नीलेश मुंडकर, डाॅ.विठ्ठल चवळे, डाॅ.विष्णू गायकवाड यांच्यासह आरोग्य कर्मचारी केंद्रावर कार्यरत आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत दहा नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले हाेते.
फाेटाे ओळी : लसीकरण झाल्यानंतर हंडरगुळी येथील धुप्पे दाम्पत्यांनी केंद्रावर सेल्फी घेतला.