शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Video : हिम्मतवाला ! पुरात वाहून जाणारी सोयाबीनची गंजी शेतकऱ्याने आणली खेचून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 13:55 IST

Heavy rain in Latur पुरात वाहून जाणारे सोयाबीन वाचविण्याची शेतकऱ्याची धडपड पाहून येईल डोळ्यात पाणी

ठळक मुद्देनिलंगा तालुक्यात मंगळवारी राञी जोरदार पाऊस झालागंजी लावुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात वाहुन गेले. 

- बालाजी थेटे

औराद शाहजनी (जि. लातुर) : निसर्ग कोपल्यास सारे हतबल होऊन पाहत राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, मेहनतीने पिकवलेले पिक पुरात वाहून जात असताना काहीच न करता केवळ पाहत राहणे कुठल्याच शेतकऱ्याला पटणारे नाही. लातूर जिल्ह्यातील चांदुरी ( ता. निलंगा ) गावात पुरात वाहून जाणारी सोयाबीन गंजी शेतकऱ्याने हिम्मत दाखवत खेचून सुरक्षित स्थळी आणली. कधीही हार न मानणारा बळीराजाचा बाणा दाखवणाऱ्या या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

निलंगा तालुक्यात मंगळवारी राञी जोरदार पाऊस झाला यात औराद परीसरातील औराद, चांदोरी, बारसुरी, तगरखेडा, सावरी, सोनखेड, हालसी आदी गावातील शेतशिवारात नदया, ओढयाचे पाणी घुसले त्यामुळे शेतांना नद्याचे स्वरुप आले. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी करुन गंजी लावुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात वाहुन गेले. 

हिमंतीवर वाचवले वाहून जाणारे सोयाबीन यामध्ये चांदोरी येथिल दत्ता व्यंकट गाडीकर यांचे दोन एकरवरील काबाड कष्ठ करुन पिकविलेली यावर्षीची पुंजी सोयाबिन मध्ये गुंतवुन ठेवलेली सकाळी डोळया देखत वाहात जात आसल्याचे पहाताच सोबत भाऊ व शेजारी यांना घेऊन त्याने वाहात्या पाण्यात हिंमत करत आपला पोटच्या गोळ्यासारखी जपलेली सोयाबिन बनिम त्याने दोरी ,कपडा सहाय्याने पाण्यातुन ओढत बाहेर काढली. यातील निम्मी बनिम वाहून गेली पण निम्मी बनिम वाचवल्याचा आनंद दत्ताच्या चेहऱ्यावर होता. यासह अनेक शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस