शिवरायांच्या विचारांची देशाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:10+5:302021-02-15T04:18:10+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत नगर परिषद व्यापारी संकुलाच्या प्रांगणात पहिले पुष्प आ. अमोल मिटकरी यांनी गुंफले. ...

शिवरायांच्या विचारांची देशाला गरज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत नगर परिषद व्यापारी संकुलाच्या प्रांगणात पहिले पुष्प आ. अमोल मिटकरी यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पं. स. सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, कृउबाचे सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नागनाथ निडवदे, कल्याण पाटील, विजय निटुरे, पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले, बांधकाम सभापती विक्रांत भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, मराठा सेवा संघाचे विवेक सुकणे, माधव हलगरे, सतीश पाटील मानकीकर, प्रा. श्याम डावळे, समीर शेख, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, प्रतिभा मुळे, डॉ. अंजुम खादरी, बालिका मुळे, नीता मोरे, अनिता जगताप यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी सेवा संघाचे प्रदीप ढगे यांनी केले. आ. अमोल मिटकरी म्हणाले, बहुजन प्रतिपालक शिवरायांनी जात, धर्म व पंत या पलीकडे जाऊन कार्य केले. म्हणूनच त्यांच्या राज्यकारभारात मुस्लिमांसह अनेक बहुजन समाजांनी महत्त्वाची पदे व खाती साभांळली आहे. हा इतिहास नव्या पिढीतील तरुणांना प्रेरणादायी असून शिवचरित्र प्रत्येकांनी वाचणे आवश्यक आहे. तसेच जनतेच्या मनातील शंकेचे निराकरण करत महाराष्ट्र धर्म जागवण्याचा काम ही शिवरायांनी केले आहे. असे सांगून पेशव्यांनी महाराजांचा खरा इतिहास दडविल्याचा आरोप ही आ. मिटकरी यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी केले, तर आभार प्रा. मदन पाटील यांनी मानले. तब्बल दाेन तास सुरू असलेल्या या व्याख्यानमालेस नगर परिषदेचे व्यापारी संकुल माणसांनी फुलून गेले होते.