परजिल्ह्यात महामंडळाची प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:34+5:302021-06-05T04:15:34+5:30
लातूर : कोरोनाचे साखळदंड तोडून आता एस. टी. सुसाट धावायला सज्ज झाली आहे. जिल्हांतर्गत प्रवासी सेवेबरोबर परजिल्ह्यातही एस. टी. ...

परजिल्ह्यात महामंडळाची प्रवासी वाहतूक
लातूर : कोरोनाचे साखळदंड तोडून आता एस. टी. सुसाट धावायला सज्ज झाली आहे. जिल्हांतर्गत प्रवासी सेवेबरोबर परजिल्ह्यातही एस. टी. धावणार असून, शनिवारपासून पुण्यासाठी तीन गाड्या लातूर येथून सुटणार आहेत. सकाळी ७ वाजता, दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता या गाड्या प्रवाशांसाठी सुटतील. पुणे प्रवास करू इच्छिणाऱ्यांनी या बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक जाफर कुरेशी यांनी केले आहे.
जिल्हांतर्गत लातूर आगाराच्या ३० बसेस सुरू आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांतून एकूण सात बसेस जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक करतात. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. तरीही एस. टी.ची जिल्हांतर्गत सेवा सुरू होती. शुक्रवारपासून लातूर आगाराच्या तीन बसेस पुण्यासाठी धावणार आहेत. सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन वेळेत या बसेस धावतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. बसमध्ये मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांना सेवा दिली जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक कुरेशी यांनी सांगितले.