मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:32+5:302021-02-05T06:23:32+5:30
अनाथ मुलांच्या बालगृहाला भेट लातूर : संत गाडगेबाबा अनाथ मुलांच्या बालगृहाला न्यायाधीश पी. डी. रागीट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ...

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची मोहीम
अनाथ मुलांच्या बालगृहाला भेट
लातूर : संत गाडगेबाबा अनाथ मुलांच्या बालगृहाला न्यायाधीश पी. डी. रागीट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. एस. डी. कंकनवाडी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बालगृहातील मुलांची विचारपूस केली. मुख्याध्यापक पंडित लव्हरे, अधीक्षक सचिन खिल्लारी, विशेष शिक्षक नितीन वाघ, संकेत चव्हाण, विलास पवार, अंकुश शिंदे, बालाजी शिंदे आदींसह शिक्षक, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहुल
लातूर : दोन आठवड्यांनंतर जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली असून, पहाटेच अनेकजण मॉर्निंग वॉकला जात आहेत. दिवसा उकाडा तर सायंकाळी थंडी पडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचले असून, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आहे. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात थंडी नसल्याचे चित्र होते. मात्र, आता वातावरणात बदल झाला असून, पिकांना पोषक थंडी सुरू झाली आहे.
रस्त्यावरील वीजखांबांमुळे गैरसोय
लातूर : पाच नंबर चौक ते रेणापूर नाक्याकडे जाणाऱ्या नवीन सिमेंट रस्त्याच्याकडेला असलेल्या मार्गावर विजेचे खांब आहेत. त्यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री अपघाताचा धोका वाढला आहे. वीजखांब हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दरवाढीचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका
लातूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल ९४ रुपयांच्या पुढे गेले असून, डिझेल ८३ रुपयांवर आहे. दिवसेंदिवस दरात वाढ होत असून, दरवाढ कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यासोबतच खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे.